Media Coverage

सामना     Dailyhunt Logo    

महाराष्ट्रातील सर्वोत्तम किक बॉक्सर्सची राज्यस्तरीय रंगतदार लढत!

वाको (WAKO) नियमावलीनुसार आयोजित महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६

उत्साहपूर्ण वातावरणात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली.

या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट

तांत्रिक कौशल्य, दमदार फिटनेस, आत्मविश्वास आणि क्रीडाभावाचे दर्शन घडविले.

स्पर्धेमध्ये Children, Cadet, Junior, Senior आणि Masters गटांतील

खेळाडूंनी विविध वजनी गटांमध्ये रोमांचक सामने खेळले. स्पर्धेचे आयोजन वाको महाराष्ट्रच्या

तांत्रिक नियमावलीनुसार करण्यात आले असून अनुभवी पंच, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या

देखरेखीखाली सर्व सामने पार पडले.या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आगामी

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असून महाराष्ट्र संघ अधिक बळकट

करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, सर्व जिल्हा संघटना,

प्रशिक्षक, पंच, स्वयंसेवक, पालक आणि खेळाडू यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

प्रमुख वैशिष्ट्ये

• महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा उत्स्फूर्त सहभाग
• WAKO नियमावलीनुसार स्पर्धेचे आयोजन
• अनुभवी पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामने
• राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू निवडीची संधी
• शिस्त, गुणवत्ता आणि क्रीडाभावाचा उत्कृष्ट संगम

This is a free homepage created with page4. Get your own on www.page4.com
 
Sports Kickboxing Association Mumbai City 0