राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष किकबॉक्सिंग स्पर्धा जल्लोषात संपन्न
मुंबई : धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विशेष किकबॉक्सिंग स्पर्धा तसेच विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट, स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर व एस.एस.के.के.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या स्पर्धेत ५० विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.