क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय व जिल्हा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित राज्य शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे उत्साहात संपन्न झाली.
स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय रेफरी विघ्नेश उमेश मुरकर यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली.
या स्पर्धेत व्ही. एन. सुळे गुरुजी स्कूलच्या ग्रिषम मनीष पटवर्धन याने दमदार कामगिरी करत उत्कृष्ट प्रदर्शन केले.